🕒 1 min read
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, जे लोक माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची चर्चा करतात, ते लोकसभेत भाषण दिल्यानंतर त्यांचे नेते पंतप्रधानांना मिठी मारायला गेले होते हे विसरले आहेत. आझाद म्हणाले की, मी स्वतः काँग्रेस सोडलेली नाही, पण मला घर सोडायला भाग पाडले.
जेव्हा घरच्यांना वाटतं की हा माणूस नको आहे. इथे जर आपल्याला परके मानले तर इथून निघून जाणे हे घरात राहणाऱ्या माणसाचे काम आहे. सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे खुशामत करणाऱ्या किंवा ट्विट करणाऱ्यांना पक्षात स्थान मिळाले आहे. तसेच पुढे जे लोक माझा डीएनए मोदी वाला असल्याची चर्चा करतात त्यांनी आधी स्वत:कडे बघावे. मोदींनी काँग्रेस मुक्त भारताची घोषणा दिली होती.त्यांचीच राहुल गांधींनी भेट घेतली.
तसेच पुढे आझाद म्हणाले कि, “तीस वर्षांपूर्वी सोनिया गांधींबद्दल जो आदर होता, तो आजही आहे. इंदिरा गांधीबद्दल जो आदर आहे तसाच आदर राहुल गांधींबद्दलही आहे. त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मी प्रार्थन करेन. राहुल गांधी यांना यशस्वी नेता बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण त्यांनी फार रुची घेतली नाही.” काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षात अनेक बैठका होत होत्या. मात्र, या बैठकांमध्ये माझा एकही सल्ला घेण्यात येत नव्हता अशी नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. ते म्हणाले की, ज्यांचा नरेंद्र मोदींच्या राज्यसभेतील भाषणाला विरोध आहे. ते अशिक्षित आणि अडाणी असतील तर त्यांनी मोदींचे भाषण वाचावे. मोदी साहेबांचे लग्न झाले नाही, त्यांना मुले नाहीत. पण त्यांनी माणुसकी दाखवली आहे. “मोदी हे केवळ बहाणा आहे. जी-२३ सदस्यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिल्यापासून त्यांना माझ्यासोबत समस्या आहेत. कोणीही त्यांच्या विरोधात लिहावं किंवा प्रश्न विचारावेत, असं त्यांना नको असतं” अशा शब्दात आझाद यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rupali Patil । पुन्हा पानटपरीवर चुना लावायला बसावं लागेल, रुपाली पाटलांचा गुलाबराव पाटलांना इशारा
- Karan And Bipasha | “मला आणि करणला मुलीची अपेक्षा आहे…” ; बिपाशा बसूने शेअर केली तिच्या मनातली गोष्ट
- Dussehra Melava | शिवसेना दसरा मेळावा हायजॅक? दोन वेळा अर्ज करुनही BMC कडून परवाणगी नाही
- Supriya Sule | पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देणाऱ्या अमोल मिटकरींच्या आम्ही पाठीशी, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- Farmer’s Death | धक्कादायक! विधान भवनाबाहेर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
