Share

खोट्या कोरोना टेस्ट करून अधिकारी आणि नेत्यांनी कोट्यावधी रुपयांचा केला भ्रष्टाचार ?

Published On: 

🕒 1 min read

पटना- कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत 70 लाखाहून अधिक लोंकाना लस देणारा भारत जगातील सर्वात वेगवान देश बनला आहे.कोविड -19 विरुद्ध भारताची लढाई इतर आघाड्यांवरही दररोज यश मिळवून देत आहे. गेल्या 24 तासांत 17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

गेल्या 24 तासांत देशात 12,923 नवीन रुग्णांची नोंद झाली. याच कालावधीत 11,764 रुग्ण बरे झाले.रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर (97.26%) असून जागतिक स्तरावरील सर्वोच्च दरापैकी एक आहे.एका बाजूला हि दिलासादायक बातमी समोर येत असताना आता बिहारमध्ये मात्र कोरोना टेस्टच्या मुद्द्यावरून राजकारण होऊ लागले आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गुरुवारी कोरोना चाचणीवरून नितीशकुमार सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की बिहारमध्ये बनावट कोरोना चाचणी दाखवून राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे.

तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे की,’भ्रष्टाचारी नीतीश कुमार यांच्या सरकारची मर्जी चालली असती तर कोरोना काळातील गरिबांचे मृतदेह विकून पैसे मिळवले असते.आम्ही याविषयी सत्य माहिती देवूनही , मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री उद्धटपणे दावा करायचे की बिहारमध्ये योग्य चाचण्या घेतल्या जात आहेत. चाचणीच्या खोट्या दाव्यांमागील खरा खेळ आता समोर आला आहे. बनावट चाचण्या दाखवून नेते आणि अधिकाऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर पैसे लाटले आहेत.

दरम्यान, तेजस्वी यादव नितीशकुमार सरकारवर नेहमीच भ्रष्टाचाराचा आरोप करीत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी नितीशकुमार यांना भ्रष्टाचाराचे भीष्म पितामह म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!