Share

एकाचवेळी 22 जण कोरोनाबाधित, रत्नागिरी जिल्ह्यात धोका वाढला

Published On: 

रत्नागिरी : नाही नाही म्हणता रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता 74 एवढा झाला आहे. कारण एकाचवेळी 22 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

नव्या बाधित रुग्णांमध्ये सर्वधिक 11 जण मंडणगडमधील, 7 जण रत्नागिरी तर 4 जण दापोलीतील आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 74 वर पोहचली आहे.बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये कोरोना बाधितांची संख्या 22 ने वाढली आहे. एकाच वेळी 22 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हावासीयांनामध्ये खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त असल्याचं प्रशासनाने घोषित केलं होत. मात्र अवघ्या काही तासातचं कोरोनाने पुन्हा शिरकाव केला. मंडणगड तालुक्यात तब्बल अकरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर रत्नागिरी शहर रत्नागिरीमध्येही सातजणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. दापोलीमध्ये चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन गंभीर झाले आहे. आता मुंबई-पुण्यात अडकलेले नागरिक पुन्हा जिल्ह्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनावर ताण येत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राज्यात कोरोनाने बऱ्यापैकी अनेकजणांना आपल्या कवेत घेतले आहे. मुंबई-पुणे या प्रमुख शहरांनाचं कोरोनाने लक्ष्य केले आहे. त्याचबरोबर औरंगाबाद, मालेगाव- नाशिक, इकडे देखील दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आज कोरोनाच्या तब्बल 1495 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,922 वर गेली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या 

चंद्रकांत पाटलांचे पक्षासाठी शून्य योगदान, एकनाथ खडसेंनी घेतला समाचार

स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला ८ कोटी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!