Share

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 ची नुकसान भरपाई वाटप होणार

Published On: 

बीड : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये बीड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई मार्फत राबविण्यात आली होती. यामध्ये बीड जिल्ह्यातून 21.62 लाख अर्जदार शेतकऱ्यांनी 7.64 लाख क्षेत्राचे पीकसंरक्षित करून 7422.54 लाख विमा हफ्ता भरलेला होता.विमा कंपनीकडून अधिसूचित असलेल्या पिकांपैकी तुर, कापूस व कांदा या पिकाची नुकसान भरपाई येत्या काही दिवसात मंजूर होऊन वाटपाचे काम सुरू होणार आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजारची मर्यादा वाढवावी

खरीप, ज्वारी , बाजरी व सोयाबीन या अधिसूचित असलेल्या सर्वच महसूल मंडळात नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मंजूर झालेली आहे. सहभागी शेतकऱ्यांपैकी 1231864 शेतकऱ्यांना 59905.76 लाख नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मंजूर होऊन वाटपाचे काम झाले आहे.

ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेल्या पिकांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर गठीत तक्रार निवारण समितीकडे तक्रार अर्ज विमा भरलेल्या पावतीची छायाकंन प्रतीसह तालुका कृषी कार्यालयात उपस्थितीत भारतीय कृषी विमा कंपनी यांचे प्रतिनिधी यांचेकडे लेखी अर्ज करावा असे आवाहन राजेंद्र निकम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड यांनी केले आहे.

पीक नुकसानीच्या पंचनाम्यास मान्यता देण्यास विमा कंपनी नकार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!