Share

जायकवाडीचे बारा दरवाजे बंद, 4 दरवाज्यातून विसर्ग सुरूच

Published On: 

पैठण : येथील जायकवाडी धरणाचे गोदापात्रात पाणी सोडण्यासाठी उघडण्यात आलेले 16 पैकी 12 दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता फक्त चार दरवाजांमधून चार हजार 282 क्युसेक पाण्याचा गोदापात्रात विसर्ग सुरू आहे. धरण सहायक अभियंता यांनी ही माहिती दिली.

सद्यःस्थितीत जायकवाडी धरणाची पाणीपातळी शंभर टक्क्यांवर स्थिर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जायकवाडी धरणाची पातळी वाढत असल्यामुळे गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदा पावसाळा सुरू होण्याअगोदरपासूनच धरणाची पातळी कमी होण्यास सुरवात झाली होती. यानंतर पावसाळा सुरू झाला तरीही जून, जुलै हे दोन महिने पाऊस नसल्याने धरणात पाणी आले नाही. परंतु ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर मात्र नाशिक जिल्ह्यात मोठा पाऊस झाला व यामुळे गोदावरीला पूर आला.

या पुराचे पाणी जायकवाडीत दाखल झाले. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरवात झाली. धरणाची मृतसाठ्यात गेलेली पातळी जिवंत होऊन पाणीसाठा वाढू लागला. यानंतरही नाशिक येथे अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे गोदावरीला महापूर आला व या पुराचे पाणी पुन्हा जायकवाडीच्या दिशेने झेपावले. जायकवाडी धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले. सोळा दरवाजांमधून सोडण्यात येत असलेले पाणी आता केवळ चार दरवाजांमधून सोडण्यात येत आहे.

जायकवाडी धरणामधून यंदाच्या पावसाळ्यात जेव्हापासून गोदापात्रात पाणी सोडण्याची सुरवात करण्यात आली, त्या दिवसापासून ते आजपर्यंत धरणाच्या 16 दरवाजांतून पाणी सोडण्यात येत होते; परंतु यातील 12 दरवाजे बंद करण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला आहे. धरणात सध्या चार हजार 282 क्युसेक पाणी येत असून तेवढाच विसर्ग सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192734831517372417?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192731373682868225?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!