Share

टीव्हीएस कंपनीकडून ‘हे’ प्रसिद्ध दुचाकी मॉडेल लाँच

Published On: 

नवी दिल्ली: तरुणाई मध्ये आणि बाईक रायडर्स यांच्या कडून विशेष पसंती असलेल्या अनेक बाईक्स बाजारात उपलब्ध असतात. यामध्ये टीव्हीएस मोटर कंपनीची अपाचे या बाईकचा उल्लेख करता येतो. तर आता तरुणाईमध्ये लोकप्रिय आणि तरुणाईची गरज लक्षात घेऊन कंपनीने आरटीआर १६० ४ व्ही हे २०२१ मधील मॉडेल लाँच केले आहे.

या दुचाकीची किंमत १,०७,२७० रुपये (एक्स शोरुम दिल्ली) आहे.अपाचे १६० ४ व्हीमध्ये १५९.७ सीसी एक सिलिंडर इंजिन आहे. त्यामध्ये १७.६३ पीएस हे दोन श्रेणीमध्ये उपलब्ध आहे. डिस्क ब्रेक व्हर्जनची किंमत १ लाख १० हजार ३२० रुपये आहे. तर ड्रम ब्रेक श्रेणीमधील मॉडेलची किंमत १ लाख ७ हजार २७० रुपये (एक्स शोरुम किंमत) आहे.

२०२१ श्रेणीमधील अपाचे आरटीआर १६० ४ व्ही ही २ किलो वजनाने कमी आहे.डिस्क प्रकारची दुचाकी ही १४७ किलोची तर ड्रम श्रेणीच्या दुचाकीची किंमत १४५ किलो आहे.दुचाकीमध्ये कार्बन फायबर पॅटरचे नवीन ड्यूल टोन सीट आहेत.एलईडी हेडलँप हे स्टाईलिश लूकमध्ये आहेत.

कंपनीचे प्रमुख (विपणन) मेघाश्याम दिघोले म्हणाले की, आम्हाला आत्मविश्वास आहे. हे मॉडेल टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४ व्ही मोटरसायकलच्या यशाचा प्रवास आणखी सुरू ठेवणार आहेत. नवीन टीव्हीएसचे मॉडेल हे पॉवर आणि वजनामध्ये उत्तम आहे. त्याची टॉर्क्यु वाढविण्यात आली आहे. ग्राहकांना दुचाकी स्वारीचा तंत्रज्ञानाने अधिक चांगला अनुभव घेणे शक्य असल्याचे दिघोले यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!