टीम महाराष्ट्र देशा – शहरात उघड्यावर लघुशंका करणाऱ्या व्यक्तिला नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलाच दणका दिला आहे. कार्यलयात येताना उघड्यावर लघुशंका करणाऱ्या व्यक्तिला पकडून मुंढेंनी मनपा कार्यालयात नेलं. तसेच त्याच्याकडून दंडही वसूल केला.
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे त्या व्यक्तीकडून ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला. संबंधित व्यक्ती जिल्हा न्याय मंदिर येथे चपराशी पदावर काम करते. या कारवाई संदर्भात महानगरपालिकेतर्फे जिल्हा न्यायालयाला पत्र पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आपल्या शहराची स्वच्छता राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, लघवी करणं या वाईट सवयी टाळा. प्रसाधनांचा वापर करा, उघड्यावर लघवी करताना आढळल्यास उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई केली जाईल, असं असं आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात कारवाई कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
दरम्यान, तुकाराम मुंढेंनी महापालिका आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यापासूनच कार्यालयातील अधिकाऱ्यांनी धसका घेतला आहे. दुसरीकडे जनतेत मात्र महापालिका कारभाराला शिस्त लावली जात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

