Share

संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न : विराट कोहली

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – आजपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. “मी अशा कोणत्याही मनस्थितीत नाही की मला इथे स्वत:ला सिद्ध करायचे आहे. मी इथे फक्त संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे मला संघासाठी धावा करायच्या आहेत आणि भारतीय क्रिकेट संघाला पुढे न्यायचे आहे.” असे विराट कोहलीने मालिका सुरु होण्याआधी स्पष्ट केलं आहे.

इंग्लंडचा हा १००० वा कसोटी सामना आहे, पण जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला भारतीय संघ त्यांच्या आनंदावर विरजण घालू शकतो. भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये इंग्लंडमध्ये अखेरची कसोटी मालिका जिंकली होती.

कसोटी मालिकेपूर्वी उत्तम सराव व्हावा म्हणून भारताने ट्वेन्टी-२० व एकदिवसीय मालिकेचे आयोजन आधी केले. त्यानंतरही इंग्लंडमधील स्थानिक संघ इसेक्सशीही तीनदिवसीय सराव सामना खेळून स्वत:च्या जमेच्या व कमकुवत बाजूंची चाचपणी केली. तेव्हा इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर खेळण्यासाठी भारतीय फलंदाज किती सक्षम आहेत, याचे उत्तर लवकरच मिळेल. दुसरीकडे कर्णधार जो रूट स्वत: फॉर्मात असून त्याला अनुभवी अलिस्टर कुक व युवा किटॅन जेनिंग्स, डेव्हिड मलान व जॉनी बेअरस्टो कसे साथ देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव.
इंग्लंड : जो रूट (कर्णधार), अलिस्टर कुक, किटॉन जेनिंग्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो (यष्टिरक्षक), मोईन अली, आदिल रशीद, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, सॅम कुरान.
सामन्याची वेळ : दुपारी ३:३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३

डिव्हिलियर्स नावाच्या वादळाचा क्रिकेटला अलविदा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!