मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई या काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिझन ३ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. तृप्ती देसाई या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी घाणेरड्या कमेंट करत ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनवले आहे.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाई या पुन्हा एकदा महिलांच्या हक्कासाठी काम करण्यासाठी सरसावल्या आहेत. यासाठी अनेकदा त्यांना तुरुंगातही जावं लागलं आहे. नुकतंच रबरी लिंगाच्या प्रात्यक्षिकाला तृप्ती देसाईंनी पाठिंबा दर्शवला होता. यामुळे अनेकांना त्यांना ट्रोल केले होते. मात्र नुकतंच तृप्ती देसाईंनी या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. तृप्ती देसाईंनी याबाबत एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

तृप्ती देसाईंनी फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. तसेच अनेकांनी ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान तृप्ती देसाईंची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

