Share

ट्रक चोरून पार्ट वेगळे केले; आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी

Published On: 

औरंगाबाद : रस्‍त्‍यावर उभा केलेला ट्रक चोरुन त्‍याचे पार्ट वेगळे करणाऱ्या धुळ्यातील दोघांना एमआयडीसी वाळुज पोलिसांनी गुरुवारी सकाळी बेड्या ठोकल्या. त्‍यांच्‍याकडून हायवा ट्रकचे सुटे करुन ठेवलेले पार्ट पोलिसांनी जप्‍त केले आहेत.

कुलदिप सिंग गुर‍बसिंग रंधावा (४८, रा. शिवानंद कॉलनी, मोहाडी ता.जि. धुळे) आणि आफताफ खान चांदखान (२७, रा. जामचा मळा चाळीसगाव रोड जि. धुळे) अशी आरोपींची नावे असुन त्‍यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी दिले.

प्रकरणात रामनाथ प्रभाकर उडाण (४६, रा. आयोध्‍यानगर, बजाजनगर) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादी हे कॉन्‍ट्रक्टर असून त्‍यांच्‍या नावे एक हायवा ट्रक (क्रं. एमएच-२०-डीटी-०२०३) आहे. फिर्यादी हे सोलापुर धुळे हायवे रोड बनविण्‍यासाठी हायवाचा वापर करित आहेत. ९ ऑगस्‍ट रोजी सायंकाळी हायवा चालक जनार्दन आवसरमोल याने हायवा जैस्‍वाल लॉनच्‍या बाजुला उभा केला होता. संधी साधत चोरट्यांनी तो लंपास केला. दुसऱ्या दिवशी फिर्यादीच्या निदर्शनास ही बाब आली. यानंतर एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यता आला.

मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी वरील दोघा आरोपींना अटक करुन न्‍यायालयात हजर केले. सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील सयद शहनाज यांनी आरोपींकडून जप्‍त करण्‍यात आलेले हायवाचे स्‍पेअर पार्ट आरोपींनी कोणकडून घेतले याचा तपास करुन त्‍याला अटक करणे आहे. आरोपींचे साथीदार असून त्‍यांना देखील अटक करणे आहे. आरोपी चोरी केलेल्या ऐवजाची विक्री कोठे करतात, विल्हेवाट कशी लावतात यांचा तपास करणे असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!