Share

कंगना राणावतची बाजू घेणाऱ्यांनो २६ /११ च्या हल्यातील शहीदांचे योगदान आठवा…

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर प्रतिनिधी: मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर वाटते आणि इथे राहणं सुरक्षित वाटत नाही असे म्हणून मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणारी कंगना राणावत देशद्रोही आहे. मात्र शिवसेनेला विरोध म्हणून कंगना रणावतला भारतीय जनता पार्टीने समर्थन दिले आहे. त्या भाजपवाल्यांनी किमान २६/११ च्या मुंबई वरील दहशतवादी हल्ला शहीद झालेल्या पोलिस बांधवांचे योगदान आठवावे. अशी उपरोधात्मक टीका मोहोळ तालुक्याचे शिवसेना नेते नागेश वनकळसे यांनी केली.

२६/११ ला मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे यांसह अनेक जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्या हल्ल्याच्या खुणा मुंबईसह महाराष्ट्र वासियांच्या हृदयावर कोरल्या गेल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पत्रकारितेचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणारे अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत हे दोघे मुंबई पोलिसांच मनोधैर्य खचविण्याचं पाप करीत आहेत.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचे कट-कारस्थान या दोघांनी सुरू केले आहे. अशा समाजकंटक कंगना राणावत तिला भाजप मात्र खुलेआम पाठिंबा देऊन मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या शौर्याचा अपमान करीत असल्याची भावना नागेश वनकळसे यांनी महाराष्ट्र देशा शी बोलताना व्यक्त केली.

भारतीय संविधानानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. मात्र कंगना राणावत अभिनेत्री या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग हत्यार म्हणून महाराष्ट्राच्या विरोधात करीत आहे. मुंबई पोलीस जगात नंबर वन आहेत. वेळ प्रसंगी आपल्या प्राणांची बाजी लावून त्यांनी मुंबईचे रक्षण केल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्या मुंबई पोलिसांची एका अभिनेत्रीकडून होणारी हेटाळणी वेदनादायी असून कंगना राणावत आणि भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातील जनता माफ करणार नसल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या बातम्या:-

हे सर्वात घाबरट आणि लोकशाही विरोधी सरकार : देवेंद्र फडणवीस

मोठी बातमी: शरद पवार यांचे कंगनाच्या बाजूने वक्तव्य

मोदी सरकारने युवकांचा अपेक्षाभंग केला; युवक काँग्रेसचा आरोप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!