मुंबई : निती आयोगाने (NITI) नुकताच भारताचा राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक (National Multidimensional Poverty Index -MPI) अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार पोषणापासून वंचित असलेल्या पाचपैकी चार राज्ये भारतीय जनता पार्टी शासित आहेत. महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असून ३६.०९ टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित असल्याचे या अहवालात म्हंटले आहे. यावर मुंबई काँग्रेस (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी ट्विट करत भाजपावर टीका केली आहे.
भाई जगताप ट्विट करत म्हणाले, नीती आयोग रिपोर्ट..- गरीबी – टॉप ५ राज्यात ४ बीजेपी शासित राज्ये… उत्तर प्रदेश क्रमांक १ वर… कुठे नेऊन ठेवला रे देश माझा..!! अशी टीका भाई जगताप यांनी केली आहे.
नीती आयोग रिपोर्ट..-
गरीबी – टॉप ५ राज्यात ४ बीजेपी शासित राज्ये…उत्तर प्रदेश क्रमांक १ वर…
कुठे नेऊन ठेवला रे देश माझा..!!
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) November 28, 2021
या अहवालात देशभरातील पाच राज्यांची माहिती देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रात ३६.०९ टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित आहेत. पश्चिम बंगालमध्ये ३३.६२ टक्के, कर्नाटकमध्ये ३३.५६ टक्के आणि तेलंगणात ३१.१० टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित असल्याचे नमुद आहे.
महत्वाच्या बातम्या
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल


