Share

टोकीयो पॅरालिम्पिक! भारतीय खेळाडूंनी पटकावली दोन दिवसात ७ पदके

Published On: 

मुंबई : काही दिवसापुर्वी टोकीयो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने धडाकेबाज कामगीरी करत ७ पदके पटकावली होती. मात्र आता सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तर अवघ्या दोनच दिवसात ७ पदके पटकावली आहे. भारतीय खेळाडूंनी १ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई केली आहे.

भारतासाठी पहिले पदक हे टेबल टेनीसमध्ये भाविना पटेलकडून मिळाले. टेबल टेनीस वर्ग ४ मध्ये भाविनाने रोप्य पदक पटकावले. तर उंच उडी प्रकारात भारताचा खेळाडू निशाद कुमारने २.०६ मीटर उंच उडी घेत रौप्य पदकाला गवसणी घातली. यानंतर विनोद कुमारने थाळीफेक एफ ५२ मध्ये १९.९१ मीटर थाळी फेकत कांस्यपदक पटकावले. हे तिन्ही पदक २९ ऑगस्ट म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिनी पटकावल्याने या दिवसाचा आनंद द्विगुणीत झाला. महत्त्वाची बाब म्हणजे, थाळीफेकमध्ये भारताने तब्बल ३७ वर्षांच्या कालावधीनंतर पदक पटकावले.

यानंतर दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट रोजी भारतीय खेळाडूंचा धडाका सुरुच होता. महिलांच्या १० मीटर एयर रायफल क्रीडा स्पर्धेत १९ वर्षीय भारतीय खेळाडू अवनी लेखाराने इतिहास रचत सुवर्णपदक पटकावले. पॅरालिम्पिक स्पर्धेत शुटींगमध्ये पदक पटकवणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. तसेच या क्रीडाप्रकारात सर्वात युवा आणि सुवर्णपदक पटकावणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली.

अवनीनंतर थाळीफेक स्पर्धेत योगेश कथुनियाने ४४.३८ मीटर थाळी फेकत रोप्यपदक पटकावले. तर भालाफेक स्पर्धेत देवेंद्र झंझारीयाने रौप्य आणि सुंदर सिंग गुज्जरने कांस्यपदकाची कमाई केली. देवेंद्रने ६४.३५ मीटर भाला फेकला आणि सुंदर सिंगने ६४.०१ मीटर अंतरावर भाला फेकला. भारतीय खेळाडूंच्या या कामगीरीवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!