Share

‘मोदी सरकारच्या मग्रूरीला विरोध म्हणून आजचा बंद’, प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया

Published On: 

सोलापूर : लखीमपूर खेरीच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. परंतू राज्यभरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. भाजप, मनसेसह अनेकांनी या बंदला विरोध दर्शवत टीका केली आहे. तर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

‘भाजप आणि मोदी सरकारला हमारा कोई कुछ नही बिगाड सकता, असे वाटते. ज्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले, त्या मंत्र्याने दुसरीकडे उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले. इतके हे सरकार निगरगट्ट झाले आहे. सरकार देशातील लोकांचा अंत पाहत आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहून आम्ही काय काय करू शकतो, ते दाखवण्याचा प्रयत्न आहे, सरकारच्या मग्रूर पणाच्या विरोधात बंद पुकारला आहे, असे प्रणिती शिंदे यांनी सोलापूर येथे माध्यमांना सांगितले.

आम्ही लढत राहू, आमच्याकडे दुसरा काही पर्याय नाही. केंद्रात आम्ही विरोधी पक्ष आहोत. आमचाही आवाज दाबला जातो. आम्ही लोकांसोबत आहे. निवडणूक हेच सर्वात मोठं यंत्र असतं. आता लोकांना कळून चुकलंय की, भाजप सरकार किती क्रूर आहे असंही त्या म्हणाल्या.

जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ‘लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेले हत्याकांड आहे. लखीमपूर हत्याकांडाची जालीयनवाला बाग हत्याकांडाशीच तुलना होऊ शकते. भाजपा महाराष्ट्र बंदला विरोध करून लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांचं जे हत्याकांड झालं, शेतकऱ्यांना चिरडून मारलं त्याचं अप्रत्यक्ष समर्थन करत आहे. भाजपच्या शेतकरी विरोधी गोष्टींना सर्वच स्तरातून विरोध होतोय. आम्ही बंद कुणावरही लादत नाहीये. त्यामुळे बहुतेक ठिकाणी लोकच यात सहभागी झालेत.’ अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!