Share

राज्यात आतापर्यंत १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण

Published On: 

मुंबई : राज्यात मंगळवारी 274 केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंत 14 हजार 883 (52.68 टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरु होते. लस घेतल्यानंतर गंभीर प्रतिकूल परिणाम झाल्याची घटना झाली नसून उद्यादेखील लसीकरण सत्र आयोजित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

राज्यात शनिवारी 34 जिल्हे आणि 27 महापालिका क्षेत्रामध्ये लसीकरणाचे सत्र सुरु झाले असून कोविन पोर्टलवर 17 हजार 762 व्हॅक्सीनेटर्स आणि 7 लाख 85 हजार 927 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजेपासून लसीकरणाला सुरुवात झाली.

मंगळवार सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) 

अकोला (181), अमरावती (239), बुलढाणा (359), वाशीम (212), यवतमाळ (289), औरंगाबाद (335), हिंगोली (120), जालना (231), परभणी (229), कोल्हापूर (545), रत्नागिरी (245), सांगली (432), सिंधुदुर्ग (161), बीड (142), लातूर (221), नांदेड (276), उस्मानाबाद (238), मुंबई (595), मुंबई उपनगर (1002), भंडारा (206), चंद्रपूर (399), गडचिरोली (187), गोंदिया (144), नागपूर (656), वर्धा (386 टक्के), अहमदनगर (650), धुळे (313), जळगाव (397), नंदुरबार (285), नाशिक (710), पुणे (1403), सातारा (511), सोलापूर (681), पालघर (319), ठाणे (1434), रायगड (150)

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!