Share

राष्ट्रवादीत घुसमट, अस्वस्थ उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. आज दुपारी मुंबईत ही भेट होणार आहे. आगामी लोकसभेसाठी साता-यातील उमेदवारी वरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत कलह निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत एका गटानं उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर उदयनराजे अस्वस्थ झाले आहेत.

मुंबईतील बैठकीत भोसले यांच्या नावाची कोणीही शिफारस केली नाही. या बैठकीनंतर उदयनराजेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आपण साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहोत. पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मात्र, शरद पवारांचे जसे सर्वपक्षीय मित्र आहेत तसे आपलेही सर्व पक्षात मित्र आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.

दरम्यान,राष्ट्रवादीतून उदयनराजे यांच्या लोकसभा उमेदवारीला होणारा विरोध पाहून विविध पक्षांनी राजेंना आपल्या पक्षातून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान,रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनीही उदयनराजेंना आपल्या पक्षात आमंत्रण दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांची राष्ट्रवादीकडून अवहेलना सुरू आहे. स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा स्वाभिमानाने पुन्हा भाजपमध्ये यावे, असे जाहीर निमंत्रण भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी सुद्धा दिले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!