Share

…अखेर तृतीयपंथी सपना आणि बाळूचे शुभमंगल सावधान!

Published On: 

🕒 1 min read

बीड: तृतीयपंथी समाज आजही सर्वांत दुर्लक्षित समाजापैकी एक आहे. आज ही त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ दिले जात नाही. तृतीयपंथीयांना पण भावना असतात. त्यांनाही आनंद, दुःख, प्रेम, माया या सगळ्याच भावना त्यांच्या मनात असतात. पण त्यांच्या भावनांना आपण वाट मोकळी करू देत नाही. पण आज एका तृतीयपंथीयाच्या आयुष्यात खूप आनंदाचा क्षण आला आहे. आज बीडमध्ये तृतीयपंथी सपना आणि बाळू यांचा विवाह पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी बीडकरांनी मोठी गर्दी केली होती. सपना आणि बाळू गेल्या अडीज वर्षांपासून लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत होते. अडीच वर्षांनंतर त्यांनी लग्नाचा विचार केला.

या लग्नाला समाजात विरोध होत असल्यानं लग्न नेमकं कसं करावं, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. मात्र आज अखेर सामाजिक न्याय विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तर सामाजिक कार्यकर्त्यांनी सपनाचे कन्यादान केलं. विवाह प्रसंगी सपना आणि बाळूला विविध सामाजिक स्तरातून मदत करण्यात आली. या लग्नाला बाळूच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र या दोघांच्या प्रेमापुढे कुटुंबाला झुकावे लागले. विवाह बंधनात अडकल्यानंतर नवीन आयुष्याला सुरुवात करून हे लग्न शेवटपर्यंत टिकेल, असा विश्वास देखील या दोघांनी व्यक्त केला आहे.

लग्नाचे मुख्य आकर्षण होते. ते म्हणजे संजय झाल्टे आणि शिवलक्ष्मी. या दोघांनी बाळू आणि सपनाच्या लग्नासाठी कालपासूनच बीडमध्ये हजेरी लावली होती. हे दोघेही सपनाच्या मागे खंबीर उभे राहिले. समस्त बीडकरांच्या उपस्थितीत हा मोठ्या थाटात विवाह पार पडला आहे. बँड, बाजा, वरात मिरवणूक लग्नाच्या अक्षदा आणि बीडचे ग्रामदैवत कन्कलेश्वर मंदिर परिसरात हा विवाह पार पडला आहे. संसार उपयोगी साहित्य मनी मंगळसूत्र याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते सतीश भोसले यांनी स्वीकारून मामाचे कर्तव्य पार पाडले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!