मुंबई : ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान’चे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सध्या वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भिडे यांच्या वक्तव्यावर अत्यंत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊतांनी संभाजी भिडेंना खोचक सल्ला दिला आहे.
‘आज विजयादशमी आहे. अशा दिवशी शुभ बोललं पाहिजे. अजून तरी या देशानं लाज सोडलेली नाही. २०२४ मध्ये ते स्पष्ट दिसेल,’ असा टोला राऊत यांनी हाणला. ‘शिवसेना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेच, पण २०२४ नंतर शिवसेना राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल. आज लोकसभेत १८ आणि राज्यसभेत ३ मिळून एकूण शिवसेनेचे २१ खासदार संसदेत आहेत. दादरा नगरहवेलीमध्ये कलाबेन डेलकरही निवडून येणार आहेत. त्यानंतर २२ खासदार होतील,’ असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
‘भारत हा स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे. जगाच्या पाठीवर १८७ देश आहेत. त्यात १ अब्ज २३ कोटी लोकांचा एक देश जगात आहे. प्रदीर्घ काळ परक्यांचा मार खात, परक्यांचा दास्यत्व पत्करत, परक्यांचं खरकटं उष्टं खात राहिलेला निर्लज्ज लोकांचा हा देश आहे, तो म्हणजे भारत,’ असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है म्हणू नये; गुलाबरावांचा मनसेला टोला
- आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का?; राम कदमांचा सवाल
- ‘महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भाजपचा बुरखाच फाटला’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- तर ५६ शिवसेनेचे आमदार आता भाजपसोबत असते – गुलाबराव पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

