टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी राजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच राज्यात आज दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता कमी असल्याचाही हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे विधार्भातील बळीराजाला पावसासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राज्यात मान्सूनचं आगमन झाल आहे. परंतु येत्या २२ ते २५ जूनच्या दरम्यान तो राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या भागांमध्ये सक्रीय होईल असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

