टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेने निशाणा साधला आहे. राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असतांना महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातला दिले जात आहे. असा आरोप मनसेने केला आहे.
राज्यातल्या तेरा जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ असतांनाही महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातच्या शेतीला दिले जात आहे. राज्यातील ४६ टीएमसी पाणी गुजरातला वळवले आहे. केवळ मोदी आणि शहा जोडीला खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला दिले. असा आरोप मनसेचे नेते व माजी आमदार नितीन भोसले यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात पाणी देण्याचा असा कोणताही करार झाला नाही. मुख्यमंत्री जाहीर भाषणात खोटी माहिती देत जनतेची दिशाभूल करत आहेत, असेही त्यांनी म्हंटले.
याचबरोबर, महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला जात आहे. ते पाणी महाराष्ट्रासाठी साठवून परत वळवावे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेकदा बोलणे झाले परंतु आमच्याकडे पैसे नाहीत जेंव्हा केंद्र पैसा देईल तेंव्हा विचार करू असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचेही त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे, मनसे नेते नितीन भोसले पाण्यासाठी तेरा दुष्काळी जिल्ह्यांमध्ये जाऊन पाणीयात्रा काढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

