Share

मुलाच्या लग्नाची पार्टी भोवली; कॉंग्रेस नेत्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या अडचणी वाढल्या

Published On: 

नंदुरबार- नंदुरबार मधील कॉग्रेस नगरसवेक यांनी आपल्या मुलाच्या लग्नाप्रित्यर्थ दिलेल्या स्नेहभोजन प्रकरणी अखेर नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्ह्यातील संचारबंदी आणि साथरोग कायदा तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याच ठपका कॉग्रेस नगरसेवक परवेझ खान यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

झराळी येथील फार्महाऊस वर रविवारी झालेल्या स्नेहभोजनामध्ये पन्नास हुन अधिक लोक सामील झाल्याचे प्रशानाच्या चौकशीत आढळुन आले होते. हे सारे प्रकरण बाहेर आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रांतअधिकारी, तहसिलदार आणि पोलीस निरीक्षक यांची चौकशी समिती गठीत केली होती. या नंतर आज तहसिलदार नंदुरबार यांनी स्वतः तालुका पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या स्नेहभोजनातील खानसमाच कोरोना बाधीत झाल्याचा आरोप जोर धरु लागल्या नंतर हे प्रकरण चिघळले होते. मात्र आयोजक कॉग्रेस नगरसेवक यांनी मात्र कोरोना विषाणूबाधीत खानसमा नसुन आपले नातेवाईक असल्याचे दावा करत होते. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर या स्नेहभोजनासाठी उपस्थित बडे नेते मंडळी, अधिकारी आणि प्रतिष्ठीत मंडळी यांच्यावरही काय कारवाई होते याकडे आता सर्वांच्या नजरा लागुन आहेत.

दरम्यान परवेझ खान यांच्यावर १८८,२६८,२६९,२९० आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५४ व साथरोग अधिनियम १८९७ ते कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या वाढू नये म्हणून सवर्सामान्य नागरिकांप्रमाणे लोकप्रतिनिधींकडून नियमांचे पालन करण्याची अपेक्षा आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज…

रयत क्रांती तर्फे मोदी सरकारने घेतलेल्या शेतकरी हिताच्या निर्णयाचे साखर वाटून स्वागत

दिवस फिरले; राणू मंडल यांच्यावर पुन्हा आली उपाशीपोटी राहण्याची वेळ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!