Share

पुणे विभागात आतापर्यंत १०१ रुग्ण पॉझिटीव्ह – डॉ. दीपक म्हैसेकर

Published On: 

पुणे, दि.3: पुणे विभागात कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्या ३ एप्रिल सायंकाळ अखेर १०१ असून पुणे ५७ , पिंपरी चिंचवड १४ , सातारा ३ , सांगली २५  आणि कोल्हापूर २ अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने २०१८ होते. त्यापैकी १८७८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून १४० चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी १७७७  नमुने निगेटीव्ह आहेत व १०१ नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत १८ रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे.

विभागामधील ८१७८ प्रवाशापैकी ३९९६ प्रवाशांबाबत फ़ॉलोअप सुरू असून ४२८२ प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे, आजपर्यंत १५,६१,९९२  घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत ७२,८७,२९१  व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४९०, व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

रुग्णालयाबाबत बोलतांना ते म्हणाले, पुणे विभागात एकूण ८८ ठिकाणी क्वारंटाइन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकूण १२  हजार ८४८ बेडस उपलब्ध आहेत तसेच ५२ ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकूण २१६७ बेडस उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे विभागात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांचे रुग्णालयांकडे सद्यस्थितीत एकूण एन-95 मास्क ४९  हजार ८४५  ट्रिपल लेअर मास्क ४ लाख ६९ हजार १९४ एवढे उपलब्ध आहेत. तसेच ३ हजार ७८१ पीपीई किट तसेच १२ हजार ९४४ सॅनीटायझर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!