Share

लाखो फॉलोअर्स असलेल्या टिकटॉक सेलिब्रिटीची गोळ्या घालून हत्या

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- प्रतिस्पर्ध्यांवर टीका करणारा एक व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केल्याने दिल्लीतीला टिकटॉक सेलिब्रिटीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.मोहित मोर असे त्या सेलिब्रिटीचे नाव असून त्याचे टिकटॉकवर पाच लाख फॉलोअर्स आहेत. मोहितची हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहित मोर हा टिक टॉकवर अत्यंत लोकप्रिय होता. त्याचे ५.१७ लाख फॉलोअर्स होते. द्वारका येथे गँगवॉर झालं यामध्येच मोहितची हत्या झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी साडे चारच्या दरम्यान मोहित आपल्या मित्रांना भेटण्यासाठी फोटो स्टेटच्या दुकानात गेला होता. त्याचवेळी गुंडांनी या दुकानावर हल्ला करत मोहितवर गोळ्या झाडल्याचं समोर आलं आहे.

पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेत असून, याप्रकरणी नजफगढ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहितच्या हत्येनंतर काही माणसं पळत जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. त्यातल्या दोघांच्या चेहऱ्यावर हेल्मेट होतं तर एकाचा चेहरा हा उघडा होता. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!