मुंबई : छोटया पडद्यावरील ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोच्या दुसऱ्या सिझनचा स्पर्धक शिव ठाकरे. तसेच शिव हा ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता असून तो खूप चर्चेत आला होता. शिव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अशातच शिवचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यास खूप पसंती मिळत आहे.
डान्सर जुईली वैद्य हिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती शिव ठाकरेसोबत जबरदस्त डान्स परफॉर्मन्स देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने शिवला टॅग केले आहे. ते दोघेही ‘तौबा तुम्हारे ये इशारे’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. डान्समधील दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. या व्हिडिओमध्ये शिवने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट, पांढऱ्या रंगाची पँट आणि पायात काळ्या रंगाचे शूज घातले आहेत. तसेच जुईलीने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि स्कर्ट घातला आहे. तसेच पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत.
https://www.instagram.com/reel/CVW7biXpzCf/?utm_medium=copy_link
या व्हिडिओवर चाहत्यांसह चक्क बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने’टू क्लीन ‘ अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री रॉय लक्ष्मी हिने फायर ईमोजी पोस्ट केली आहे. अशाप्रकारे बाकी अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. शिवने याआधी एमटीव्हीवरील ‘रोडीज’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आला होता. काही दिवसांपूर्वी त्याचे ‘शिलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी इमुजी शेअर करत भरपूर पसंती दर्शविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बीड जिल्ह्यात २४ तासांत २ शेतकऱ्यांची गळफास घेत आत्महत्या
- अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी
- ’24 तास आर्यन खानच्या बातम्या देणारे मुख्यमंत्र्याला आणि परिवहन मंत्र्याला जाब विचारायला तयार नाहीत’
- इंडिज-बांगलादेश संघांत आज होणार लढत; आव्हान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य
- ‘समीर वानखेडे मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहे याचा अर्थ याने फर्जीवाडा केलाय’


