सांगली : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
भाजपमधील ‘हेच’ लोक फडणवीसांना ‘टरबूज्या’ म्हणायचे, अनिल गोटेंचा दावा
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.
पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडकून टीका केलीय. ज्या नेत्याचं डिपॉझिट जप्त झालं होतं त्याच्याविषयी काय बोलायचं. हा सूर्यावर थूंकण्याचा प्रकार आहे अशी टीका त्यांनी केली. साताऱ्यात केली.
संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटत असताना शरद पवार यांनी मात्र यावर मौन साधलं होत. मात्र पवारांनी आज साताऱ्यात यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘पडळकरांना लोकांनी बाजूल केलं आहे. त्यांच्यावर काय बोलायचं. मी पडळकर यांना फार महत्व देत नाही. त्याचं बारामतीत डिपॉजिट जप्त झाल आणि सांगलीत सुद्धा ते पडलेत त्यांना महत्व देण्याची गरज नाही.’ असा टोला लगावत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, पवारांवर टीका केल्याने पडळकरांना राज्यात फिरु देणार नाही असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात थेट पडळकरांना दुचाकीवरुन फिरवलं .
जत नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके यांनी स्वत:च्या दुचाकीवर पडळकरांना बसवून, शहरभर फिरवून, राष्ट्रवादीच्या जखमेवर मीठ चोळले आहे. एडके एवढ्यावरच थांबले नाहीत तर याशिवाय गोपीचंद पडळकर यांचा हारतुरे घालून सत्कारही केला.
वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
दरम्यान, पक्षाच्या नाकावर टिच्चून पडळकर यांना शहरभर फिरवणे या नगरसेवकाला चांगलेच महागात पडले आहे.या प्रकरणी पक्षानं आता गंभीर दखल घेतली आहे. नगरसेवक लक्ष्मण एडके यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एडके यांची राष्ट्रवादी पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
