टीम महाराष्ट्र देशा : बोटिंग दरम्यान भर वाढल्याने बोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील नळदुर्गच्या किल्ल्यातील बोरी नदीच्या पात्रात घडली आहे. यामध्ये २ मुली आणि एका मुलाचा समावेश होता.
सानीया फारुक काझी (वय ७), इजान एहसान काझी (वय ५, रा. नळदुर्ग) हे चुलत बहीण भाऊ पाण्यात बुडून मृत्यू पावले तर यामधील अलमाज शफीक जहागिरदार (वय १२, रा. मुंबई) हिचा उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एहसान नय्यरपाशा काझी हे आपल्या नातेवाईकांना घेवून किल्ल्यातील नदीपात्रात बोटींग करण्यासाठी गेले होते. दरम्यान, बोटमध्ये बसून बोटींगचा आनंद घेत असताना बोटीच्या समोरच्या बाजूचा भार वाढल्याने बोट पाण्यात उलटली. माहिती मिळताच किल्ल्यात उपस्थित आसलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाण्यात उतरत सात जणांना बाहेर काढण्यात यश मिळविले. परंतु त्या तीन लहानग्यांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

