🕒 1 min read
मुंबई: गणेशोत्सव अवघ्या दिवसांवर आला आहे. दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबई, पुण्यासारख्या शहरांतून कोकणातील आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करायला जात असतात. त्यामुळे चाकरमानी आणि गणेशोत्सव हे समीकरणच बनलेले आहे. कित्येक महिने अगोदर विशेष रेल्वेगाड्या व एसटी बसेसचे आरक्षण फुल्ल होत असते. यंदा, कोरोनाच्या संकटाने मात्र या गणेशोत्सवावर विर्जन घातल्याचे दिसून येत आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरीसारख्या कोकणातील जिल्ह्यातील अनेक गावांत १४ दिवस क्वारंटाईनची सक्ती करण्यात आली आहे, जी पाळणे सर्व चाकरमान्यांना शक्य होऊ शकणार नाही. तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने गावी जायचे तर कसे? असा प्रश्न देखील निर्माण झाला होता. तर खासगी वाहने अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्याने आर्थिक बुरदंड देखील बसत आहे.
"ई- भूमीजन" करा म्हणणारे आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अद्याप "ई पास" देऊ शकले नाहीत.
त्यामुळे ई- दलालांचा सुळसुळाट झालाय त्यांची चौकशी करा!
चाकरमान्यांबाबत मा. मुख्यमंत्री घोषणा करणार होते…एसटीच्या गाड्या सोडणार होते..कधी?
कोकणी माणसाचा अंत पाहू नका!
(1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 3, 2020
‘जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते…’
यावरून, भाजपाच्या अनेक नेत्यांसह आशिष शेलार यांनी सरकारवर वारंवार प्रश्नांची झडती लावलेली दिसत आहे. आज त्यांनी एक ट्विट केले असून शिवसेनेसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ” ‘ई- भूमीजन’ करा म्हणणारे आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अद्याप ‘ई पास’ देऊ शकले नाहीत.त्यामुळे ई- दलालांचा सुळसुळाट झालाय त्यांची चौकशी करा! चाकरमान्यांबाबत मा. मुख्यमंत्री घोषणा करणार होते…एसटीच्या गाड्या सोडणार होते..कधी? कोकणी माणसाचा अंत पाहू नका!,’ अशी घाणघाती टीका करत चाकरमान्यांची व्यथा मांडली आहे.
आमच्या कोकणी माणसाच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा अँटीबॉडी चाचण्यांचे 250 रुपये मोठे नाहीत… त्यामुळे सर्वांच्या मोफत अँटीबॉडी चाचण्या करा… त्यांना सुरक्षित सन्माने कोकणात जाण्यासाठी परवानगी द्या!
तातडीने निर्णयाची घोषणा करा… सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये!
(2/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 3, 2020
राममंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा – चंद्रकांत पाटील
तसेच, कोकणात जाणाऱ्या या गणेशभक्तांच्या आरोग्याची तसेच स्थानिक लोकांना कोणताही धोक्याची शंका राहू नये म्हणून मोफत अँटीबॉडीचाचण्यांची मागणी देखील केली आहे. “आमच्या कोकणी माणसाच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा अँटीबॉडी चाचण्यांचे 250 रुपये मोठे नाहीत… त्यामुळे सर्वांच्या मोफत अँटीबॉडी चाचण्या करा… त्यांना सुरक्षित सन्माने कोकणात जाण्यासाठी परवानगी द्या! तातडीने निर्णयाची घोषणा करा… सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये!”, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
हे राजकीय षडयंत्र; मी 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार – संजय काकडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
