टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचार होत आला आहे. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता. त्यानंतर कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भाषावार प्रांतरचनेवेळी कर्नाटकात अडकलेल्या सीमाभागातील मराठी भाषिक आणि हा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त वक्तव्य पाटील यांनी केले. मराठी भाषिकांनी कर्नाटकाच्या स्वाभिमानाला धक्का सतत पोचविला आहे. त्यांना गोळ्या घाला, असे म्हणण्याचे धाडस दाखवा. मराठी भाषिकांना सीमेवर उभे करून तेथे गोळ्या घाला. त्याला आमचा पाठिंबा असेल. त्याचे काय परिणाम होतील, ते होऊ दे. सीमाप्रश्न एकदा संपविला जावा.” अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
भीमाशंकर पाटील यांच्या बेताल वक्तव्यावर शिवसेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष किरण साळी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘ महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागसाठी गेले अनेक वर्षे लढा सुरु आहे. इतके वर्षे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि तेथील जनतेने ही आंदोलने आणि लढे शांततेत केले आहेत. मात्र मराठी भाषिकांवर गोळ्या घालण्याची भाषा करणाऱ्यांना माज आला आहे. सीमाभागातील जनतेबाबत कर्नाटक सरकारची ही मुजोरी आहे. गोळ्या घालण्याची भाषा करणाऱ्यांवर कर्नाटक सरकार कारवाई करणार आहे का असा प्रश्न साळी यांनी विचारला आहे. भीमाशंकर पाटील यांच्यासारखे नेते आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत.
तर गेले कित्येक वर्षे सीमाभागातील जनता महाराष्ट्रात येण्याची मागणी करत आहे. पण कर्नाटक सरकारने बेळगाव- कारवर भागातील जनतेसाठी काय केले? महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना त्यांनी सिमाभागासाठी काय केले? पाटील यांच्या या बेताल वक्तव्यावर भाजप सरकारने काय भूमिका घेणार? या सर्व प्रश्नाचे भाजप उत्तर देणार का? असेही साळी यावेळी विचारले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

