मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला आज सकाळी सुरुवात करण्यात आली होती. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं आहे. यानंतर कंगना रणौत भावुक झाली असून तिने ट्विटरवरून राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर घणाघात सुरूच ठेवला आहे.
आज कंगना रणौत मुंबईमध्ये दाखल झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सुडबुद्धीच्या राजकारणाने कंगनाचे कार्यालयावर कारवाई केली जात असल्याचे आरोप आता शिवसेनेसह मुंबई महापालिकेवर होत आहे. कंगना रणौतच्या कार्यालयावर बीएमसीकडून करण्यात आलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने केलेली आहे का? असा प्रश्न विचारला असता, शरद पवार यांनी ‘याबाबत अधिक माहिती नाही. पण सध्याची परिस्थिती बघता वेळ चुकली, तसेच अनधिकृत बांधकाम हा विषय मुंबईसाठी नवा नाही’ अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिल्याने सगळ्यांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहेत.
दरम्यान, आता अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावरील बीएमसीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे. उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा या प्रकरणी सविस्तर सुनावणी होणार आहे. त्यावेळी कंगना आणि बीएमसी आपापली बाजू हायकोर्टात मांडतील.
महत्वाच्या बातम्या:-
आज मेरे घर टूठा हैं, कल तेरा घमंड टूटेगा; उद्धव ठाकरेंना कंगनाचा टोला
मोदी सरकारने युवकांचा अपेक्षाभंग केला; युवक काँग्रेसचा आरोप
आता शिवसेनेची पडझड…काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

