Share

सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी थांबलेल्यांना मालवाहू वाहनाने उडवले, तिघे गंभीर

Published On: 

बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील नांद्री फाट्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी थांबलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत मालवाहू वाहन घुसल्याने तीघे गंभीर जखमी झाले आहेत. सुप्रिया सुळे या शेगांवकडे जात असताना कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. शनिवारी रात्री साडेआठ वाजेदरम्यान ही घटना घडली. अपघात घडला तेव्हा सुप्रिया सुळे तीथे नव्हत्या, त्यामुळे त्या सुरक्षित आहेत.

सुप्रिया सुळे या बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. शनिवारी रात्री त्या शेगांवकडे निघाल्या असता रस्त्यात नांद्री फाट्यावर स्थानिक कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते. या दरम्यान एक मालवाहू वाहन या कार्यकर्त्यांच्या गर्दीत घुसले आणि हा अपघात झाला. भाजप पदाधिकारी शांताराम बोधे आणि अशोक हटकर अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले आहे.

खासदार सुप्रिया सुळे या बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुलडाणा येथे विविध बैठकी कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यानंतर त्या एका कार्यक्रमासाठी शेगांवकडे निघाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!