देशात ८२ हजार जनावरं लंम्पी आजाराने दगावली तर लाखो जनावरं लंम्पीग्रस्त असल्याने पशुधनावर आणि पर्यायाने बळीराजासमोर मोठं संकट उभं राहिलंय. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री स्वतः जातीने लक्ष ठेवून असल्याने काही अंशी दिलासा नक्कीच मिळत आहे.
मृत पावलेल्या पशुधनास #NDRF निकषात असलेल्या मदतीप्रमाणे राज्यसरकार स्वतःच्या तिजोरीतून ३० हजार रुपयांची मदत देत आहे. परंतु सात वर्षे जुने NDRF निकष आणि दुधाळ जनावरांच्या वाढलेल्या किंमती बघता ही मदत पुरेशी नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं अतिरिक्त मदत मिळणं गरजेचं आहे.
केंद्र सरकारने लम्पी आजाराला epidemic म्हणून घोषित केल्यास SDRF मधील ‘आपत्ती निवारण आणि पुनर्वसन’ या सेक्शन अंतर्गत मदत देता येऊ शकते. असं झाल्यास शेतकऱ्यांना राज्य शासनाची ३० हजार आणि #SDRF ची ३० हजार अशी एकूण ६० हजार ₹ पर्यंत मदत मिळू शकते. राज्यशासनाने या संदर्भात केंद्राकडे त्वरित पाठपुरावा करायला हवा.
राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी ‘गोधन खतरे मे’ सांगणारे नेते आज गोधन खऱ्या अर्थाने संकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत. राजकारणासाठी ज्यांचा तिसरा डोळा क्षणार्धात उघडतो तो अद्यापही उघडलेला नाही. चित्ते रुळले असतील तर राष्ट्रीय मीडियानेही लम्पीकडं लक्ष केंद्रित करायला हरकत नाही.
महत्वाच्या बातम्या
- Bhavana Gawali | “काल मी ताई होते, आज मी बाई झाले…”, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ व्यक्तव्यावरुन भावना गवळी झाल्या भावूक
- Narayan Rane | “उद्धव ठाकरे यांनी काल दारू पिऊन भाषण केलं”, नारायण राणे
- PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेत आलेल आहेत काही महत्वाचे अपडेट्स, जाणून घ्या!
- Narayan Rane : उद्धव जगातला सर्वात ‘ढ’ माणूस; नारायण राणेंची संतप्त टीका
- मुलगा आर्यन खान च्या अटकेवर आई गौरी खानने प्रथमच तोडले मौन, म्हणाली “यापेक्षा वाईट काही नाही…”
- Anil Parab | शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होईल, कारण…; अनिल परबांचं मोठं वक्तव्य


