🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे सरकार कुणाच्या दबावाखाली काम करतय का? विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा सवाल केला आहे. ५० खोके एकदम ओक्के म्हटल्यावर शिंदे गटातील आमदारांना मिर्च्या झोंबल्या, असे म्हणत अजित पवारांनी टोला देखील लगावला आहे.
अजित पवार म्हणाले, “शिंदे सरकार कुणाच्या दबावाखाली झुकत आहे का?, दबाव झुगारुन देण्याची ताकद या सरकारमध्ये नाही का?. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय कारण नसताना कुणाच्या समोर झुकायचं नाही. इथं झुकायला सुरवात झाली अजून तर अडीच महिने सुद्धा नाही झाले. जसे ५० खोके एकदम ओक्के ह्या त्यांना मिर्च्या झोंबल्या. (शिंदे गटातील आमदार) हे रात्री बावचळून उठतात खोकं…खोकंं…खोकं!”
अजित पवार यांचे एकनाथ शिंदेंना टोमणे –
मुख्यमंत्र्यांच्या सकाळी ६ वाजता झोपण्याच्या वक्तव्यावरुन अजित पावर यांनी चांगलेच टोमणे लगावले. “एकनाथ शिंदे म्हणाले मी सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो, मग हे झोपतात कधी? २४ तास माणूस एक-दोन दिवस काम करु शकेल. किंवा सुरतला गेल्यावर आता पद मिळणार म्हणून जागू शकेल. पण कधीतरी मेंदू म्हणेल, अरे झाेप…झोप. सहा तास तरी झोप पाहीजे. आम्ही ५५ वर्ष शरद पवारांच काम पाहील आहे. ते रात्री दोन वाजता जरी झोपले तरी सकाळी ७ ला तयार असायेच. पण ते देखील ५ ते ६ तास झोप घ्यायचे. पटेल असं बोलावं राव लय पुढचं बोलायला लागलाय. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, आम्हाला आदार आहे. पण तुम्ही न पटण्यासारखे बोलायला लागल्यावर आम्हालाही बोलायला लागणार”, असे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Honeymoon Destinations | जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये हनिमून ला जाण्याचा विचार करत असाल तर हे सर्वोत्तम डेस्टिनेशन.. जाणून घ्या !
- Ajit Pawar | “पटेल असं बोलावं राव…” ; अजित पवारांचे एकनाथ शिंदेंना टोमणे
- Prakash Ambedkar | ‘वेदांता प्रकल्प गुजरातला गेलं याला अजित पवार कारणीभूत’, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
- Cuteness Overloaded | रागात असलेल्या शिक्षिकेची समजूत काढण्यासाठी विद्यार्थ्याने दिली गालावर पप्पी…पाहा व्हिडिओ
- Jayant Patil | “कंपनीला जे सांगितलं जात आहे तेच ट्विट केलं जात आहे, जनतेला…” जयंत पाटील कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
