Share

जे मला ट्रोल करत आहेत, तेच माझं काम बघून कौतुक करतील : रोहित पवार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. याची जोरदार तयारी रोहित पवार यांनी सुरु केली आहे. ‘माझं काम पाहिल्यानंतर ट्रोल करणारेच माझं कौतुक करतील’ अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाना साधला आहे.

पुण्यात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी ते विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियातून रोहित पवार यांना ट्रोल करण्यात आलं आहे. त्याला उत्तर देताना “अलीकडच्या काळात पेड ट्रोलर्सची संख्या वाढली आहे. त्यामुळे मी विधानसभा लढवण्यास इच्छूक असल्याचं जाहीर केल्यानंतर मला ट्रोल करण्यात आलं. पण, असं असलं तरी मला राजकारणात सक्रिय व्हायचं आहे. त्यामुळे ट्रोलर्सकडे लक्ष देऊन मी माझ्या चांगल्या कामात बाधा आणणार नाही”असं विधान रोहित पवार यांनी केल आहे तसेच, जे आता मला ट्रोल करत आहेत, तेच पुढे माझं काम बघून कौतुक करतील, असा टोलाही रोहित पवार यांनी ट्रोलर्सला लगावलाय.

दरम्यान, रोहित पवार वरिष्ठ सांगतील त्या जागेवरून लढणार असल्याचं स्पष्ट करत असले तरी त्यांनी मागील वर्षभरापासून हडपसर आणि कर्जत-जामखेड या विधानसभा मतदार संघात दौरे करून मोर्चेबांधणी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!