Share

थोरात म्हणजे दिशा हरवलेला माणूस, विखे पाटलांची घणाघाती टीका

Published On: 

अहमदनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी महसूलमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे. मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्ष पद मिळाले. थोरातांची स्वतःची कर्तबगारी काय? थोरात म्हणजे दिशा हरवलेला माणूस असल्याचं सांगत त्यांनी निशाणा साधला. गेल्या सहा महिन्यात त्यांनी अशी कोणती कर्तबगारी दाखवलीय, असा सवाल विखे पाटील यांनी केला आहे.

धक्कादायक : सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण

दुसरीकडे विखे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सत्तेच्या वाटमारीत शिवसेनेचं मोठं नुकसान होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही मोठी फरपट होताना दिसत आहे. त्यामुळे आता सत्तेत राहयचं की नाही याचा विचार शिवसेनेने करण्याची वेळ आली आहे. असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. मातोश्रीचा रिमोट आता शिवसेनेच्या हातात राहिलेला नाही, असंही विखे म्हणाले आहेत.

राज्यात कोरोना सारखं मोठ संकट असताना राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. कोणताही निर्णय घेताना सरकारमधील तिन्ही पक्षात समन्वय नाही. राज्य सरकारच आज संभ्रमात आहे. राज्यातील जनतेच्या प्रश्नासाठी बैठक होत नाही तर आपापसातील वाद मिटवण्यासाठी बैठका होत आहे. काँग्रेसला एव्हढी लाचारी का करावी लागत आहे? असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार असल्याची सणसणीत टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. काँग्रेसची राज्यात वाताहात झाली असल्याचंही विखे पाटील यावेळी म्हणाले.

बाहुबली प्रभासची कारण जोहरवर घणाघाती टीका, केला धक्कादायक खुलासा

दरम्यान, महाआघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस सत्तेसाठी लाचार झाले आहे. कॉंग्रेसच्या मंत्र्यांना तेथे कोणीच विचारीत नाही. सत्तेसाठी कॉंग्रसचे एवढे लाचार प्रदेशाध्यक्ष आपण पहिल्यांदाच पाहत आहोत. थोडाफार स्वाभिमान शिल्लक असेल, तर त्यांनी सत्ता सोडून बाहेर पडावे, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता यापूर्वीच केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!