Share

‘या’ राज्याने कोरोनावर मिळवली मात, तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा भयावह

Published On: 

उत्तराखंड : देशात कोरोबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना एका राज्यात मात्र गेल्या 4 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. उत्तरखंड या राज्यात एकही कोरोना रुग्ण नसल्याने या राज्याने कोरोनावर नियंत्रण मिळवले असल्याचं बोललं जात आहे.

उत्तराखंड या राज्यात गेल्या चार दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या 35 होती. रविवारी संध्याकाळपर्यंत ही संख्या कायम राहिली आहे. उत्तराखंडमध्ये रविवारी 93 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. गेल्या चार दिवसांत एकही कोरोना संशयित येथे पॉझिटिव्ह आढळला नसल्याची माहिती उत्तराखंडच्या आरोग्य खात्याने दिली आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात 134 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत 113 रुग्ण आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 1895 वर गेली असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!