Share

‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यावर काय होतं, ते या निकालाने दाखवून दिलं’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. तर पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांनी बाजी मारली आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. या जागेवर गेली कित्येक टर्म भाजपचा गाजावाजा होता. खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोनदा या मतदारसंघातून निवडून आले होते.

मात्र, यंदा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं तगडं आव्हान भाजपसमोर होतं. भाजपला रोखण्याची शक्कल या तिन्ही पक्षांनी एकत्र येत योग्य पद्धतीने राबविल्याची या निकालातून दिसत आहे. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी पक्षासाठी काम करणाऱ्या व मत देणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानले आहेत.

‘महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं आहे. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्विकारत आहोत. हा विजय मी महाविकास आघाडीसाठी कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना समर्पित करतो. या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीच्या सोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध होते.’ असं ते म्हणाले आहेत.

यासोबतच, ‘महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आल्यावर काय होते, हे ही या निकालाने दाखवून दिले आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील व मित्रपक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व महाराष्ट्रातील जनतेचे विनम्र आभार!’ अशा भावना त्यांनी ट्विटद्वारे व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!