टीम महाराष्ट्र देशा : काल लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सर्वत्र नरेंद्र मोदींची त्सुनामी आपल्याला पाहायला मिळाली. विशेष म्हणजे राज्यात युतीचे ४१ उमेदवार तर महाआघाडी चे ६ उमेदवार विजयी झाले आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर विरुद्ध कॉंगेसचे बाळू धानोरकर अशी चुरशीची लढत झाली. या लढतीमध्ये काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा दारूण पराभव केला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जन्मगावात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुळ गाव असलेल्या चंद्रपुरात भाजपचा पराभव करणारे बाळू धानोरकर हे कॉंगेसचे एकमेव उमेदवार आहेत.
दरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जायचा परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी त्याला सुरंग पाडला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
