Share

“पुढील तीन वर्ष त्यांना हेच करायचंय”, भाजप नेत्यांच्या सरकार बरखास्त करण्याच्या मागणीवर राऊतांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डनच्या दंडमाफी प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी काल(२२ जाने.)राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेत यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. तसेच यासंदर्भात मंत्रीमंडळाविरोधात एफआयआरची नोंद करावी व मंत्रीमंडळ बरखास्त करावं, अशी मागणी केली आहे. दरम्यान, यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,’सरकारला दोन वर्ष झाली असून उत्तम कामकाज सुरु आहे. पुढील तीन वर्ष अजून चालेल. विरोधी पक्षाकडे काही काम नाही. खरं तर त्यांच्याकडे मोठी ताकद आहे, त्यांनी जर विधायक काम केलं तर ते लोकशाहीत उत्तम काम करु शकतात. पण वेळ घालवण्यासाठी त्यांच्याकडे दुसरं काहीच साधन नसल्याने अशा प्रकारचे उद्योग करत असतात.’

दरम्यान, राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असतांना पाटील म्हणाले की,’राज्यपालांकडे आम्ही आज निवदेन सादर केले आहे. तसेच आम्ही त्यांना म्हणालो की,’तुमच्या समोर घेतलेल्या शपथीचा भंग झालेला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत.’ तसेच बरोबरीने आम्ही लोकायुक्तांची देखील वेळ मागितलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे नवीन लोकायुक्त हे अजून रूजू झालेले नाहीत आणि उपलोकायुक्तांना आज सुट्टी होती. त्यामुळे सोमवारी आम्ही उपलोकायुक्तांना भेटून हे निवेदन देणार आहोत,असेही पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!