Share

‘…हे वडेट्टीवारांचे खोडसाळ राजकारण’; गडकरींनी केली पोलखोल

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील आयोजित प्रचारसभेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत टीका केली होती. ‘देवेंद्र फडणवीसांची जिरवायची हे नितीन गडकरींसोबत आधीच ठरवलं होते,’ असे खळबळजनक वक्तव्य वडेट्टीवारांनी केले होते. त्यावर आता केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी वडेट्टीवारांची पोलखोल केली आहे.

गडकरी म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मी राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांना कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये’, असा टोला नितीन गडकरी यांनी लगावला आहे.

गडकरी पुढे म्हणाले, वडेट्टीवारांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस हे माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, असे गडकरी म्हणाले.

सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,’ असा टोलाही गडकरी यांनी विजय वडेट्टीवारांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!