मुंबई : सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. आज एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपची सत्ता असलेले केंद्र सरकार राज्यसरकारला आवश्यक ती सर्व मदत करत आहे. मार काहीजण त्याचे राजकारण करत असल्यचा आरोपही केला.
पंतप्रधान निधीप्रमाणेच मुख्यमंत्री निधी हा सुद्धा महत्वाचा आहे, त्यामुळे मी मुखमंत्री निधीलाही मदत करण्याचे आवाहन केले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी बोलताना म्हणाले, या संकटाच्या काळात आम्ही राज्यातील सरकारच्या पाठीशी उभे आहोत. कोरोनाचा सामना करण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. या आव्हानात विरोधीपक्ष म्हणून काय मदत करता येईल यासाठीच आम्ही विचार करतोय.
तसेच, यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या. कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने राज्यात विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर वचक बसणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात दिवसातून दोन ते तीन वेळा पोलिसांचा फ्लॅगमार्च व्हावा. तसेच ग्रामीण भागात सोशल डिस्टन्स बाळगून नियम शिथिल केले जावेत. त्याबरोबरच रेशन पुरवठ्यातील घोळ दूर होऊन लोकांपर्यत सुरळीत धान्याचा पुरवठा व्हावा, तर महाराष्ट्रातही राज्यात भिलवाडा पॅटर्न लागू करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
