Share

‘हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही’; समीर वानखेडेंनी अनन्याला खडसावले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:   नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आहे. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घराचीही झडती घेण्यात आली. अनन्या पांडेची चौकशी देखील करण्यात येत असून यादरम्यान अभिनेत्री उशिरा चौकशीसाठी पोहोचल्याने अधिकारी समीर वानखेडेने तिला चांगलेच सुनावले आहे.

अनन्याने आर्यन खानसोबत ड्रग्स संबंधित व्हॉट्सऍप चॅट केल्याचं NCB अधिकाऱ्यांना आढळलं आहे. त्यामुळे तिच्या घराची झडती घेत तिलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. अभिनेत्री अनन्या पांडेची सलग दोन दिवस NCB कडून चौकशी सुरु आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी अनन्याला २ वाजता NCB कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र यावेळी अभिनेत्री २ तास उशिरा म्हणजेच ४ वाजता पोहोचली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही अनन्या उशिराच पोहोचली यावेळी तिला ११ ला बोलावण्यात आलं होतं मात्र ती चक्क ३ तास उशिरा म्हणजेच २ वाजता कार्यलयात पोहोचली होती.

यावरून NCB अधिकारी समीर वानखेडे तिच्यावर प्रचंड संतापले होते. यावेळी त्यांनी अनन्याला चांगलंच धारेवर धरत कडक शब्दात तिची कान उघडणी केली आहे. यावेळी वानखेडे यांनी अनन्याला म्हटलं, ‘हे तुमचं शूटिंग किंवा प्रोडक्शन हाऊस नाही. हे NCB चं कार्यालय आहे. याठिकाणी दिलेल्या वेळीच तुम्हाला यावं लागेल. अधिकाऱ्यांना तुमच्यासाठी वाट बघत बसायला वेळ नाही’. असं म्हणत त्यांनी अनन्याला सुनावलं.दरम्यान, एनसीबी ज्या व्हाट्सअॅप चॅट्सच्या आधारे अनन्या पांडे हिची चौकशी करीत आहेत, ते आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यामधील आहे. मात्र आर्यन खानसोबत ती मस्करी करीत होती. असे तिने उत्तर दिल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!