Share

काँग्रेसच्या अंपगत्वाचे आणि पोकळपणाचे हे सूचक आहे ; पटोलेंच्या वक्तव्यावर हरियाणाच्या गृहमंत्र्यांचा हल्लाबोल !

Published On: 

चंडीगढ : पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यासह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्विट का केले नाही, ते आता गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.

‘अमिताभ आणि अक्षय मनमोहन सिंह यांचे सरकार असताना ट्वीटरच्या माध्यमातून टीव टीव करायचे. इंधन दरवाढीवर टीका करायचे. आज ते का गप्प आहेत? केंद्र सरकारच्या देशविरोधी धोरणाविरुद्ध त्यांनीही भूमिका मांडावी. अन्यथा आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ’, अशी तंबी नाना पाटोले यांनी दिली होती. अमिताभ आणि अक्षय यांना शेतकऱ्यांचा विसर पडल्याने, त्यांच्या चित्रपटाचे शुटींग आणि त्यांचे सिनेमे बंद पाडू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला होता.

इंधन दरवाढीवरून काँग्रेसकडून भाजपाला लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच नाना पाटोलेंच्या वक्तव्यामुळे देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. याचे पडसाद आता राज्याबाहेरही उमटायला लागले आहेत.

यावरून हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांची माफी मागावी’, अशी मागणी अनिल विज यांनी केलीये.

‘विरोधी पक्षांची अर्थपूर्ण भूमिका निभावण्यात अक्षम असणारे नेते आता चित्रपटातील कलाकारांनाही लक्ष्य करीत आहेत. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या देशातील प्रतिष्ठित लोकांना धमकी देत आहेत. काँग्रेसच्या अंपगत्वाचे आणि पोकळपणाचे हे सूचक आहे, अशा आशयाचे ट्वीट करत अनिल विज यांनी नाना पटोले यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!