Share

‘हा तर मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव’ ; बाळासाहेब थोरातांचा आरोप

Published On: 

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. मुंबईचे हे विमानतळ आता पूर्णपणे ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या ताब्यात गेले आहे. त्याबरोबर एएएचएलचे मुख्यालय मुंबईतून हलविण्यात आले आहे.

अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती. सध्या बांधकाम सुरु असलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा ताबाही अदानी यांच्या कंपनीकडे गेला आहे. अदानींच्या या निर्णयामुळे एक मोठी कंपनी आता पुन्हा मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट झाली आहे.

यावरून आता महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी चांगलेच रान उठवले असल्याचे पाहायला मिळत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील यावर भाष्य केले आहे, ‘२०१४ नंतर मुंबईतील अनेक महत्त्वाच्या गोष्टी गुजरातला कशा नेता येतील हा प्रयत्न सुरू आहे. असं केल्याने मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही.’ असे ठाम मत यावेळी बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

तसेच यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘उद्योगांसाठी अजूनही महाराष्ट्राचं आकर्षण आहे, राज्यातील वातावरण, सुरक्षितता, यामुळे उद्योग आपल्याकडे येतात, असे देखील बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, मुख्यालय अहमदाबादला का हलवले याबाबत अदानी समुहाने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावं यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!