Share

‘एखाद्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे’

Published On: 

मुंबई : पूजा चव्हाण गूढ मृत्यू प्रकरणावरुन भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना ठाकरे सरकार पाठबळ देत असल्याचा हल्लाबोल राणेंनी केला आहे. सध्या राज्यभर पूजा चव्हाण गूढ मृत्यू प्रकरण चर्चेत आहे. राजकीय क्षेत्रात यामुळे खळबळ माजलेली आहे. संशयाच्या भोवऱ्यात असणारे मंत्री संजय राठोड गायब आहेत. या अनुषंगाने राणे बोलत होते.

‘ठाकरे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ, ताकद देत आहे. इथं कुंपणच शेत खात आहे. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियान आणि आता पूजा चव्हाण प्रकरणात तेच होत आहे. एखात्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर लैंगिक शोषण, हत्या सारखे गंभीर आरोप झाले. पण ठाकरे सरकारकडून सगळ्यांना अभय देण्याचं काम सुरु आहे’, असे म्हणत राणेंनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. या लोकांना अत्याचार करायला लायसन्स दिलंय काय? असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.

काय आहे पूजा चव्हाण गूढ मृत्यू प्रकरण ?

बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीचा पुण्यात मृत्यू झाला आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.

या आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं आहे. राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाने चांगलीच लावून धरली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजय राठोड यांची नियमांनुसार कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं. यामुळे, संजय राठोड यांच्या अडचणी अधिक वाढत असल्याचं दिसून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, अद्याप याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!