Share

Shivsena | “शहांच्या ताटाखालच्या मांजराचा हा दसरा मेळावा”; सेनेचा एकनाथ शिंदें यांच्यावर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा बीकेसी मैदानावर होणार आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मेळावा शिवाजी पार्कवर. दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. दसरा मेळाव्याला काही तासच राहीले आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये एकाच वेळेस दोन मेळावे होत असल्यामुळे संरक्षण व्यवस्थेवर ताण आला असल्याचं पाहायला मिळतं आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेवर घणाघाती टीका केली आहे. अमित शहांच्या ताटाखालच्या मांजराचा हा दसरा मेळावा आहे, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

एकनाथ शिंदे गटावर वारंवार गद्दारी केल्याचे आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून केले जातात. याच संदर्भात बोलत अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहेत. एक दिवस भारतीय जनता पार्टीच या गद्दारांना मातीत मिसळवणार असल्याचं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे. आज होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे सगळ्याचं लक्ष आहे. अशातच दानवेंनी हा शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही त्यांनी टीका केली. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मराठवाड्यातून पाचशे गाड्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सत्तार यांनी म्हटलं आहे. यावर दानवे यांनी कडाडून टीका केली. दानवे म्हणाले, “पाचशे गाड्या कुठेही नाहीत, या सगळ्या अफवा आहेत. आम्ही एसटी महामंडळाकडूनही माहिती काढली आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडून 500 गाड्या सोडण्यात आल्याचा दावा फसवा असल्याचं ते म्हणाले.

आज एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. सर्वांचं लक्ष दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यावर लागलेलं आहे. औरंगाबादचे ग्रामदैवत असणाऱ्या कर्णपुरा देवीची आरती करून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत.

दरम्यान, “गद्दारीच्या पिकाचा नायनाय करण्यासाठी देवीकडे प्रार्थना केली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा ऐतिहासिक असतो. महाराष्ट्रात शिवाजी पार्कवरुन विचारांचं सोनं लुटलं जातं. तसंच ते आजही लुटलं जाईल,” असे अंबादास दानवे म्हणाले. दानवेंच्या या वक्तव्याला शिंदे गट काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!