Share

पूर्व विदर्भात पुरामुळे लोकांचे संसार उघड्यावर, विरोधी पक्षाच्यानेत्यांनी केली ही मागणी

Published On: 

नागपूर : पूर्व विदर्भात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेशात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने आणि धरणाचे पाणी नदीत सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता पूर ओसरला असला तरी लोकांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच लोकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले आहे. पुरग्रस्थ लोक आपल्या लहान मुलाबाळांना घेऊन आपला संसार निळ्या आकाश खाली थाटत आहेत. या बाबतीत शासन कितीही गंभीर असल्याचे दाखवत असले तरी, दवाडीपार गावातील लोकांच्या समस्या येथे येऊनच कळतील. या संकटाचे बळी पडलेल्यांना राज्य सरकारने तत्काळ मदत द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पूरग्रस्त पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना देणार भेटी देतील तसेच पूरग्रस्त भागाचा आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे फडणवीसांचा हा दौरा राजकीय फायदा घेण्याचा प्रकार तर नाही ना? अशा सवाल या ठिकठिकाणी उपस्थित केला जात आहे.

दहिसरमधल्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्य महोत्सवात बोलताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे आवाहन केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, ‘विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ नये.’

दौऱ्यावर जाण्याआधी त्यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला असून ते म्हणाले की, ”पूर्व विदर्भात भयावह परिस्थिती आहे. या स्थितीला मानव निर्मित संकट म्हणेल. वेळीच अलर्ट दिले नाही. पंरतु आता तातडीने मदत देण्याची गरज आहे.’, असंही ते म्हणाले.

दरम्यान, वैनगंगेच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात 3 दिवस घरं बुडून असल्यामुळे घरं खशार झाली आहेत तर अनेक कच्ची घरं जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे अनेक लोकांनी आजूबाजूच्या घरांच्या स्लॅबचा आसरा घेतलाय आणि सध्या तिथेच आपला संसार थाटलाय, ही स्थिती फारच भयावह असल्याच्या भावना देखील फडणवीसांनी व्यक्त केल्या.

उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची शिवसेना नेते नागेश वनकळसे यांची मागणी

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना घेतलं ताब्यात!

अंतिम वर्ष परीक्षा : उदय सामंतांनी घेतली राज्यपालांची भेट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!