मुंबई : गेली कित्येक दशके महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशसारख्या राज्यात अखंड महाराष्ट्रासह देशाचे ऊर्जास्रोत असलेल्या शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विकली जात आहे. या बिडीच्या पॅकेटवर महाराजांचे फोटो देखील होता. बिडीच्या उद्योजकांविरोधात याआधी देखील शिवभक्तांकडून आवाज उठवला जात होता. यानंतर अचानक होणारे नुकसान टाळण्यासाठी फोटो व नाव काही काळाने बदलण्याचे आश्वासन या ग्रुप कडून देण्यात आले होते. मात्र तरीही या बिडीचे उत्पादन व विक्री ‘संभाजी बिडी’ या नावाने सुरूच राहिले.
आता, गेले २ दिवस हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून शिवभक्तांनी आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली यासह अनेक राजकीय नेत्यांनी देखील समाजमाध्यमातून या विरोधात आवाज उठवला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील ट्विट करून याबाबत करून आक्रमक भूमिका घेतली आहे. “संभाजी राजेंच नाव बिडी ला देण्याचे धाडस आपल्या महाराष्ट्रात होते इथेच आपण कमी पडलो! यांची आताच हिम्मत मोडली नाही तर उद्या अजुन वाढेल..एकदाच धूर निघाला पाहिजे..हर हर महादेव !!!” असे ट्विट नितेश राणेंनी केले आहे.
संभाजी राजेंच्या नाव बिडी ला देण्याचे धाडस आपल्या महाराष्ट्रात होते इथेच आपण कमी पडलो!
यांची आताच हिम्मत मोडली नाही तर उद्या अजुन वाढेल..
एकदाच धूर निघाला पाहिजे..
हर हर महादेव !!!— Nitesh Rane (@NiteshNRane) September 7, 2020
दरम्यान, पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक साबळे-वाघिरे ग्रुपवर गुन्हा दाखल करण्यात आला असून महापुरुषांचा अवमान केल्याची तक्रार शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेने केली आहे. पुण्यातील सासवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी काल रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनतेचा रोष या प्रकरणी वाढत असून गेली कित्येक वर्षे या नावाने हे उत्पादन सुरु असून यावर बंदी आणण्यासाठी राजकारण्यांनी पुढाकार का नाही घेतला असा सवाल आता निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या:-
गृहमंत्री अनिल देशमुखांना धमक्यांचे फोन वर फोन
कसाबला ‘बिर्याणी’ घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची ‘बिर्याणी’ खाताय ना?’
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी योग्य नाव दिले आहे, कारण… नितेश राणेंचा टोला

