Share

गृहमंत्री अनिल देशमुखांना धमक्यांचे फोन वर फोन

Published On: 

मुंबई :  सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुरु झालेलं तपासप्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे बनत आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण देखील तापलेल पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासून बॉलिवूडमधील नेपोटीझमसह सुशांतच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलीस व व्यवस्थेवर आक्रमकतेने अभिनेत्री कंगना रणौतने गंभीर प्रश्न मांडले. यानंतर गेल्या काही दिवसांत तिने केलेल्या वक्तव्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी तिला चांगलंच झापलेलं पाहायला मिळालं.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील कंगनाच्या वक्तव्यांचा समाचार घेत तिला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली होती, तर ड्रग्जसह आणखी एका प्रकरणी तिची चौकशी केली जाईल असे देखील सांगितले होते. यानंतर आता, गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमक्यांचे फोन वर फोन येत असल्याचे उघड झाले आहे.

काल मंगळवारी (8 सप्टेंबर) रोजी ‘कंगनापासून दूर राहा, तुम्ही चुकीचं केलंय, आतातरी सुधारणा करा’ अशी धमकी देणारे जवळपास 7 फोन आले. त्यानंतर आज (9 सप्टेंबर) पहाटे देखील 2 धमकीचे फोन आले. त्यामुळे आतापर्यंत अनिल देशमुख यांना कंगना प्रकरणी ९ फोन आले असून मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे.

दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौतवर काल विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणला गेला. यासंदर्भात काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कंगनाविरोधात हक्कभंग मांडला. कंगना ड्रग्स घेत असल्याचे अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत सांगितले होते . त्यामुळे कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी चौकशी मुंबई पोलिसांमार्फत केली जाणार आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या:-

कसाबला ‘बिर्याणी’ घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची ‘बिर्याणी’ खाताय ना?’

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी योग्य नाव दिले आहे, कारण… नितेश राणेंचा टोला

‘ही’ बाब खेदाची आणि संतापजनक; अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!