Share

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी योग्य नाव दिले आहे, कारण… नितेश राणेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आजपर्यंत आरोग्य हा विषय मागे पडला होता. मला तुमच्याकडून सहकार्य हवे आहे. जनतेला कोरोनासोबत कसे जगावे हे शिकविण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट हे शेवटचे आहे असे नाही. आपला हात हीच आपली लस आहे. यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम सुरु करत आहोत. दुबईत कायदे एवढे कडक आहेत की काही हजारांत दंड होतो. आपल्याकडे ते शक्य नाही. यामुळ जनतेला हित समजावले जाणार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नव्या मोहिमेची घोषणा काल पावसाळी अधिवेशनात केली.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम १५ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. मात्र आता ही मोहीम सुरु होण्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका होत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. त्यांनी, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेला मुख्यमंत्रींनी योग्य नाव दिले आहे..कारण..ते स्वतःच कुटुंब सोडून कसलीच जबाबदारी घेत नाहीत!! लगे रहो !!! असा टोला ट्विटद्वारे लगावला आहे.

दरम्यान, “चेस दी व्हायरस” मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. 80 ते 85 टक्के रुग्ण या भागातून आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही राज्यस्तरीय मोहीम राबवित असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, त्यांना सहभागी करून घ्या,अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:-

‘ही’ बाब खेदाची आणि संतापजनक; अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ब्रेकिंग न्यूज : ‘संभाजी बिडी’ प्रकरणी उद्योजकांवर गुन्हा दाखल

“देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताना पाठिंबा देणे हीसुद्धा बेईमानीच”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!