Share

कसाबला ‘बिर्याणी’ घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची ‘बिर्याणी’ खाताय ना?’

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेनेने हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच सामनाच्या अग्रलेखातून ‘देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ अशा शबदात शिवसेनेने टीका केली आहे.शिवसेनेच्या या टीकेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

कर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबबिर्याणीt; घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची बिर्याणी&; खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना? “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी असा हल्लबोल आशिष शेलार यांनी केला आहे.

 

तसेचरामखोरीची”निघाली तर मग  डांबरानेलिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल! 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना? असा सवालही आशिष शेलारांनी शिवसेनेला विचारला आहे.

पुढे ते म्हणाले ,मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का? पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रौनातच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना? असा सवाल त्यांनी विचारला

राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची ११ कोटी जनताही माफ करणार नाही, असं म्हणत शिवसेनेने टीका केली होती यावरून भाजपने शिंवसेनेला धारेवर धरले आहे.

 

महत्वाची बातमी

‘ही’ बाब खेदाची आणि संतापजनक; अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ब्रेकिंग न्यूज : ‘संभाजी बिडी’ प्रकरणी उद्योजकांवर गुन्हा दाखल

नाशिकमध्ये भूंकपाचे धक्के

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!